Twin Trekker Girls of Maharashtra – आजकाल आपल्याला माहित आहे कि लहान मुले हि टीव्ही, मोबाईल, टॅब यात पूर्णपणे गुंतलेली असतात. पण दोन अश्या जुळ्या भगिनी आहेत त्यांनी आज पर्यंत महाराष्ट्रातील सोपे अवघड असे १०० पेक्ष्या जास्त महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले सर केले आहेत. आज आपण त्या जुळ्या वाघिणींची माहिती वाचणार आहोत. त्या वाघिणींची नावे आहेत प्रेशा कदम आणि रेशवी कदम
📌 संक्षिप्त माहिती:
- नाव: प्रेशा कदम आणि रेशवी कदम
- वय: ६ वर्षं
- गाव: डोंबिवली, ठाणे
- गड सर केले: १००+
- ट्रेकिंग सुरुवात: २.५ वर्षांपासून
- खास गड: शिवनेरी, राजगड, कलावंतीण दुर्ग
- पालकांचे नाव: परशुराम कदम आणि सौ. वैशाली कदम
📸 इंस्टाग्रामवर या ट्रेकर बहिणींना फॉलो करा!
Twin Trekker Girls of Maharashtra – गड सर करणाऱ्या जुळ्या बहिणींचा प्रवास
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे राहणाऱ्या प्रेशा आणि रेशवी यांना त्यांच्या वडिलांनी (परेश कदम ) यांनी दोघींना अगदी लहान असल्यापासून जंगल मध्ये भटकंती, छोट्या मोठ्या किल्यावर चढाई तसेच अनेक ठिकाणी फिरून त्या ठिकाणाची माहिती देण्यास सुरुवात केली.
प्रेशा आणि रेशवी दोघींनी आपल्या वयाच्या अडीच वर्षांपासून जंगल ट्रेक फिरायला सुरुवात केली. त्यांची वाटचाल सुरु झाली ती शिवाजी महाराज यांचं जन्म ठिकाण असलेला शिवनेरी किल्ला. अतिशय काळजीपूर्वक त्यांनी हा किल्ला सर केला आणि आपल्या ध्येय पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली .
🏔️ वडिलांची किल्ल्यांप्रती ओढ आणि इतिहासप्रेम:-
महाराष्ट्रातील सगळे छोटे मोठे किल्ले सर करणे, त्यांचा इतिहास जाणून घेणे आणि शिवरायांप्रती असलेल्या प्रेमापोटी त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली आणि आपल्या मुलींना त्या मोहिमे मध्ये सहभागी केले. आजपर्यंत त्यांच्या ६ वर्ष्याच्या मुलींनी १०६ गडावर यशस्वीरीत्या चढाई केली आहे. त्यांचे वडील म्हणतात “जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी आपले प्राण स्वराज्यासाठी दिले, त्या भूमीवर आपल्या मुलींना न्यायचं होतं.” हे स्वप्न घेऊन त्यांनी आपल्या छोट्या चिमुकल्यांना अनेक गडावर नेऊन त्यांना त्या किल्याचा इतिहास, युद्धभूमी बद्धल माहिती दिली.
💪 कसं असत नियोजन, सराव :-
प्रत्येक मोहिमेची सुरुवात हि अचानक होत नसते त्या पूर्वी अनेक गोष्टींचा विचार, सराव आणि पाठबळ असावं लागत. सिमेंट च्या जंगल मध्ये प्रॅक्टिस कुठे करणार असा प्रश्न सर्वाना पडतो पण त्याचा विचार न करता वडिलांनी त्याची सुरुवात आपल्या राहत्या घरी केली . आपल्या मुलींना ७ मजली इमारतीमध्ये लिफ्ट न वापरता जिन्याचा वापर करण्यास भाग पाडले. दररोज सकाळ संध्याकाळ जीना वर खाली करण्याच्या सरावामुळे त्यांच्या पावलांमध्ये एक ताकद निर्माण झाली आणि एक सहनशक्ती मिळाली.
प्रत्येक किल्यावर चढाई करण्यापूर्वी त्या किल्लेचा पूर्ण अभ्यास करणे, स्थानिक लोकांशी बोलून मार्गदर्शन घेणे, सुरक्षा बदल माहिती घेणे, वातावरणातील बदल, वेळ, राहण्याची -खाण्याची सोय अश्या अनेक गोष्टींचा विचार मोहिमेपूर्वी करावं लागतो. काही वेळेला त्यांचं पूर्ण कुटुंब, मित्र परिवार त्यांच्या सोबत असतो जो त्यांना अवघड चढाई मध्ये मदत करतो.
🌟 ६ वर्षांच्या ट्रेकर बहिणींचा थरार – Adventure of Twin Trekker Girls
सुरुवातीला प्रेशा कदम आणि रेशवी कदम यांनी अनेक किल्ले सर केले होते. साधी आणि सोपी चढाई असलेले किल्यावर त्यांनी आपली पावलें रोवली होती. जशी जशी वर्षे पुढे जाऊ लागली तस तस दोघींचा अनुभव वाढू लागला. नंतर त्यांनी एक माहीम आखली ती म्हणजे अतिशय अवघड आणि उंच असा असलेला किल्ला म्हणजे कलावंतीन किल्ला जो रायगड जिल्या मध्ये आहे. छोट्या छोट्या पायऱ्या, दाट झाडी, एका साईडला दगडाची भिंत आणि एका साईडला खोल वर असलेली दारी आणि त्यावर चढाई त्यामुळे हा ट्रेक एक साहसी ट्रेक म्हणून गणला जातो. वयाच्या चोथ्या वर्षी दोघींनी हि मोहीम फत्ते केली . अतिशय नियोजनपूर्वक, अनुभवी १६-१८ लोकांची टीम सोबत यशस्वी रित्या चढाई केली आणि तो क्षण आयुष्यभर लक्षात राहील असा होता.
📚 शाळा आणि ट्रेकिंग:-
ट्रेकिंग मध्ये जस दोघींना आवड निर्माण होत गेली तसं त्यांनी शाळेकडे दुर्लक्ष केलं नाही. शाळेमध्ये देखील त्यांनी अभ्यासावर चांगला भर दिला. त्यांच्या शिक्षिका देखील प्रेरित झालेल्या आहेत. सुट्टीच्या वेळेला नवीन नवीन किल्यावर चढाई करणे आणि बाकीच्या दिवशी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात . शाळेमध्ये त्यांची प्रगती चांगली आहे आणि त्यामुळे शिक्षक, पालक आणि मित्रांकडून भरपूर पाठिंबा देतात.
🌟 कौतुक:-
आजच्या social media च्या वातावरणात माणूस कधी फेमस होईल सांगता येत नाही. असाच झालं एखादा एक लोकप्रिय इंस्टाग्राम पेज वरून दोघींचा किल्ला सर करतानाच विडिओ पोस्ट करण्यात आला आणि विडिओ सगळीकडे viral झाली आणि महाराष्ट्राच्या देश्याच्या कानाकोपऱ्यात पोचली आणि लाखो लोकांनी त्या विडिओ ला पसंती दिली आणि दोघींचे कौतुक देखील केले.
🚀 स्वप्न:-
प्रेशा आणि रेशवी ला फक्त किल्यावर चढाई करणे एवढाच द्येय नाहीतर रॉक क्लाइंबिंग, valley क्रोससिंग, रॅपलिंग, राफ्टिंग, एवरेस्ट अशा अनेक अवघड मोहिमा फत्ते करायच्या आहेत. त्यांचे वडील म्हणतात “स्वतः अनुभवलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते.” हळू हळू सराव, अनुभव, टेक्निकल ट्रैनिंग घेऊन भविष्यात या ठिकाणी चढाई करण्यात येईल.
पालकांसाठी संदेश आहे –
“मुलांना निसर्गात घेऊन जा, इतिहास समजवा, त्यातून त्यांच्यात जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास निर्माण होतो.”
🔚 या कहाणीमधून काय शिकायला मिळतं?
आजकालच्या धावत्या युगामध्ये पालकांकडे पुरेसा वेळ नसतो आपल्या मुलांकडे लक्ष्य देण्यासाठी आणि त्यात छोट्या रूम मध्ये आजकाल सुरु झालेले किड्स झोन, किड्स प्लेयिंग एरिया मध्ये पालक मुलांना टाकून मोकळे होत असतात. मोकळ्या निसर्गरम्य वातावरणा मध्ये मुलांना नेण्यास पालक अपयशी होत आहेत.
त्यात अपवाद असलेल्या प्रेशा आणि रेशवी या त्यांच्या नाजूक पावलांनी आपलं नाव शिवरायांच्या गड किल्यावर कोरत आहेत. सह्याद्री पर्वत रांगा त्यांना आमंत्रण देत आहेत आणि न डगमकता या दोघी सामोऱ्या जात आहेत.
