shekhar nikam chashak

आमदार शेखर निकम चषक २०२६ : 🏆 विजेत्या संघ मालकाला पहिल्यांदाच भेटणार बाइक! आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे येथे भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे भव्य आयोजन

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात वसलेले सावर्डे हे गाव टेनिस क्रिकेटच्या नकाशावर विशेष ओळख निर्माण करून आहे. येथील Young Boys Cricket Club, द्वारे आयोजित होणारी भव्य नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक मानली जाते. यावर्षी ही स्पर्धा आणखी भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
शेखर निकम प्रतिष्ठान, सावर्डे आयोजित आणि आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही स्पर्धा शुक्रवार दि. १ मे शुक्रवार ते रविवार दि. ३ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. स्थळ आहे – सह्याद्री क्रीडा संकुल, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

३६ वर्षांची परंपरा – महाराष्ट्रातील क्रिकेटची शान - १०,००० पासून ५ लाखांपर्यंतचा प्रवास

सावर्डे येथे होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात अगदी ₹१०,००० पहिल्या बक्षिसापासून झाली होती. आज तीच स्पर्धा तब्बल ₹५,००,००० प्रथम पारितोषिक देणारी भव्य स्पर्धा बनली आहे. ही स्पर्धा तब्बल ३६ वर्षांची परंपरा जपत आहे. १९९० पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक नामांकित टेनिस क्रिकेट खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. हा प्रवास केवळ रकमेचा नाही, तर सावर्डेच्या क्रिकेट संस्कृतीचा आणि आयोजकांच्या मेहनतीचा आहे.
सुरुवातीला सगळे सामने दिवसा खेळवले जात होते, मात्र कोकणातील उष्णतेमुळे आणि खेळाडूंना अधिक सोयीस्कर वातावरण मिळावे म्हणून अलिकडच्या काही वर्षांपासून ही स्पर्धा पूर्णपणे नाईट स्वरूपात आयोजित केली जाते. स्थानिक पातळीपासून राज्यस्तरापर्यंत या स्पर्धेची लोकप्रियता प्रचंड आहे. प्रत्येक वर्षी प्रेक्षकांची गर्दी, रंगतदार सामने आणि थरारक शेवट यामुळे ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरते.

यंदाची सर्वात मोठी खासियत – विजेत्या संघ मालकाला भेटणार बाइक भेट!

टेनिस क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

👉 विजेत्या संघाच्या मालकाला बाइक भेट!

हा निर्णय स्पर्धेला नवा आयाम देणारा आहे. यामुळे स्पॉन्सर्स आणि टीम ओनर्स यांना प्रोत्साहन मिळणार असून, टेनिस क्रिकेटमध्ये व्यावसायिकता वाढण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम होत असल्याने सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.

shekhar nikam chashak

दिग्गज खेळाडूंची परंपरा – मैदानाची ओळख

या ऐतिहासिक मैदानावर अनेक दिग्गजांनी खेळ केले आहेत. यामध्ये चंद्रकांत पंडित, मांजरेकर सर, वृषीकेश वैद्य यांसारख्या अनेक मोठ्या नावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
तसेच आजच्या काळातील टेनिस क्रिकेटमधील स्टार खेळाडू कृष्णा सातपुते, प्रथमेश पवार, थॉमस डायस, विजय पावले, ओमकार देसाई, केतन म्हात्रे, मंगेश वैठी, बबलू पाटील, फर्दिन काझी, पवन केने यांसारखे अनेक खेळाडू या मैदानावर आपली छाप सोडून गेले आहेत.
👉 यावर्षी देखील ISPL मधील अनेक नामांकित खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत, त्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे.

आकर्षक बक्षिसे आणि स्पर्धेची माहिती

  • 🏆 प्रथम क्रमांक : ₹5,00,000 + चषक

  • 🥈 द्वितीय क्रमांक : ₹2,50,000 + चषक

  • 🌟 मालिकावीर : ₹50,000

  • 👥 मर्यादित 12 संघ

  • 💰 प्रवेश फी : ₹50,000

  • 📅 नोंदणीची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२६

📞 संपर्क

📱 गणेश सावर्डेकर – ९९२३२८००९५
📲 देवराज गरगटे – ९८५०५८९०६१
☎️ उमेश राजेशिर्के – ७५१७७३९५५५
📞 प्रथमेश पवार – ८९६९८४९६४०
📳 अमित सुर्वे – ९५५२२२०३३३

जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल, तर १ ते ३ मे २०२६ या तारखा लक्षात ठेवा आणि सावर्डेला हजेरी लावा. सामने संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील. थरार, उत्साह आणि क्रिकेटचा खरा आनंद अनुभवण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच चुकवू नका! 🏏🔥