पुणे म्हटलं कि आपल्या डोक्यात येते ते म्हणजे शिक्षण आणि संस्कृती केंद्र, पण आता पुणे वेग वेगळ्या खेळामध्ये देखील आपली एक स्वतंत्र ओळख तयार करत आहे. आज पर्यंत आपण महाराष्ट्रातील वेग वेगळे ट्रैनिंग सेंटर पहिले आहेत. अश्या वेग वेगळ्या ट्रैनिंग सेंटर मध्ये भारत देशा साठी खेळणारे खेळाडू घडत असतात . अश्याच एका ट्रैनिंग सेंटर ची यशोगाथा आपण पाहणार आहोत आणि ते सेंटर म्हणजे “ABSF Volleyball Club Pune – व्हॉलीबॉल क्लबची यशोगाथा.” या क्लब ने आज पर्यंत अनेक राज्यस्थरीय ते आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळणार खेळाडू तयार केले आहेत.
ABSF Volleyball Club Pune - व्हॉलीबॉल क्लबची यशोगाथा आणि स्थापना
या क्लब ची सुरुवात २९ ऑगस्ट २००९ साली झाली. पै.अमोल बुचडे या प्रसिद्ध, शिक्षित आणि राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कुस्ती पटूच्या पुढाकाराने हा क्लब सुरु झाला. अमोल सर यांच्या नावाने ” Amol Buchade Sports Foundation “ या संस्थेची स्थापना करून या क्लब ला ABSF असे संबोधण्यात आले.
स्वतः अमोल सर एक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्याने यांनी क्रीडा संस्कृतीला पुढे घेऊन जाण्यासाठी वेग वेगळे उपक्रम सुरु केले. सुरुवातीला लहान पातळीवर सुरु झालेल्या या क्लब ने आता देशासाठी खेळाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे.
अनुभवी प्रशिक्षक आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण:-
सध्या क्लबमध्ये ३ प्रशिक्षक आणि सहाय्यक कार्यरत क्लब मध्ये डॉ. संतोष पवार आणि रोहित माळगावकर हे एक अनुभवी प्रशिक्षक कार्यरत आहेत. देशासाठी खेळणारे व्हॉलीबॉल खेळाडू तयार व्हावेत म्हणून नियमित ये दोघेही मेहनत घेत असतात. व्हॉलीबॉल खेळासाठी बॉल मशीन द्वारे मार्गदर्शन केले जाते. खेळाडूंची व्हॉलीबॉल प्रति प्रेरणा वाढावी या करिता प्रयत्न करत असतात. व्यायाम आणि आहार या बद्धल खेळाडूंना मार्गदर्शन केले जाते. आता या व्हॉलीबॉल क्लब मध्ये ६० ते ७० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे अगदी ५ वर्षा च्या लहान मुलांपासून ते ३० वर्षा पर्यंत खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. एक चांगला खेळाडू तयार करण्यासाठी ५०% स्वतःची मेहनत आणि मार्गदर्शन, २६% योग्य आहार, १५% पालकांचं सहभाग आणि १०% व्यवस्था याची गरज असते आणि हे क्लब ने दाखवून दिले आहे.
🏆 विजयी वाटचाल:-
हा क्लब आपल्या महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्यीय स्पर्धां मध्ये भाग घेत असतो आणि खूप साऱ्या स्पर्धांमध्ये विजयी वाटचाल करत आहे. तसेच या क्लब ने अनेक स्पर्धां च आयोजन देखील केलं आहे. ग्रामीण शहरी खेळाडूंसाठी या स्पर्धा खूप मोलाच्या ठरत असतात. अनेक राज्यस्थरीय, राष्ट्रीय स्पर्धां मध्ये या क्लब ला आमंत्रित केले जाते.
महत्वाचे म्हणजे या क्लब ने आज पर्यंत डॉ. संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १२७ राज्य पदकं , ४५ राष्ट्रीय, १७ अखिल भारतीय विद्यापीठ, ५ इंडिया कॅम्प आणि एक इंटरनॅशनल ब्राँझ पदक प्राप्त झालेले खेळाडू तयार केले आहेत.
ऐतिहासिक निवड:-
एक अभिमानास्पद क्षण म्हणजे याच क्लब मधील अलोक मनोज तोडकर याची भारतीय अंडर १९ च्या संघ मध्ये निवड करण्यात आली आहे. CAVA Cup, उझबेकिस्तान
मध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये अलोक ला भारतीय संघा मध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. तो महाराष्ट्रतून निवड झालेला तो पहिला खेळाडू आहे. अलोक हा लिबेरो म्हणून ABSF आणि भारतीय व्हॉलीबॉल संघामध्ये आहे. ABSF volleyball club Pune चे मार्गदर्शक डॉ संतोष पवार सर म्हणतात “मी अनेक वर्ष वाट पाहत होतो आणि मी जे स्वप्न पाहिलं होतं, ते अखेर हे स्वप्न सत्यात उतरलं. आज खरंच वाटतं – ‘Good Things Take Time’.”
काय आहेत योजना आणि मिळणाऱ्या सुविधा:-
या क्लब कडून खेळाडूंना खेळाचे साहित्य, कॅम्प आणि कॅरियर चे देखील मार्गदर्शन केले जाते. क्लब कडून खेळाडूंना आवश्यक शुल्क आकारले जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना देखील क्लब मध्ये संधी दिली जाते. आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच कडून मार्गदर्शन, खेळाडूंना मानसिक बलवान बनवणे, व्यायामशाळा यांचा समावेश करण्याची योजना भविष्यात आहे. सध्या मुलींसाठी प्रशिक्षण दिले जात नाही पण भविष्यात योजना आहे. येणाऱ्या काही दिवसात अनेक योजना आणून व्हॉलीबॉल मध्ये अनेक जागतिक खेळाडू तयार करण्यात येणार आहेत. भविष्यात क्लब च्या नवीन शाखा, प्रशिक्षण शिबिरं आणि लीग मध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने क्लब ची वाटचाल चालू आहे. क्लब कडून दरवषी जिल्हा व राज्य स्थरीय रात्रीच्या स्पर्धांचं आयोजन केलं जाते.
समारोप:-
खरं सांगायचं तर आजच्या आपल्या डिजिटल युगात खेळ आणि मैदान याच महत्व कमी होत असताना ABSF व्हॉलीबॉल क्लब ने या खेळाला एक नवी दिशा दिली आहे.
देशासाठी चांगले खेळाडू तयार करणे या क्लब चा मुख्य ध्येय आहे. हा नुसता क्लब नाही तर खेळांडूंसाठी प्रेरणादायी केंद्र आहे. तुम्हाला जर व्हॉलीबॉल मध्ये कॅरियर करायचं असेल तर ABSF सारखा क्लब मिळणे सुवर्णसंधी आहे.
👉 क्लबची अधिक माहिती, कॅम्प मध्ये प्रवेश आणि क्लब च्या प्रशिक्षण च्या वेळा जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील ABSF Volleyball Club,Pune यांच्याशी संपर्क करू शकता.
डॉ. संतोष पवार सर – 096658 70333
