महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट जगतात Tennis Cricket Player Omkar Desai हे नाव आज ओळखीचं झालं आहे. ISPL मधील त्याची दमदार कामगिरी आणि मेहनतीमुळे तो महाराष्ट्राचा टेनिस क्रिकेट स्टार म्हणून उदयास आला आहे.| टेनिस क्रिकेट ही केवळ खेळाची भाषा नाही, तर ती मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांचा प्रवास आहे आणि या प्रवासाचा सर्वात प्रेरणादायी अध्याय म्हणजे कोकणचा ओंकार देसाई. महाराष्ट्र काई तर देश्याच्या टेनिस क्रिकेट क्रिकेट जगतात सध्या एक नाव सतत चर्चेत आहे — ओमकार देसाई. टेनिस क्रिकेटच्या मैदानावर शांत, संयमी पण आतून तुफान जिद्दी असलेला ओंकार आज अनेक नवोदितांसाठी आदर्श ठरला आहे.
🏆Tennis Cricket Player Omkar Desai :- गौरव आणि मान
🏅 Winner of Many Major Tennis Cricket Trophies
🏏 Best Batsman of the Tournament – Mumbai Premier League 2023 (Season 3)
🌟 Brand Ambassador of Mumbai Tennis Cricket
🎯 Icon Player in India Premier Tennis Cricket League (ISPL)
🧢 Multiple ‘Man of the Match’ Awards
🏆 Several ‘Man of the Series’ Titles
🥇 Recognized as Best Batsman & Best Player in Various Tournaments
💫 Consistent Performer with Outstanding Batting Records
🏆 Many More Prestigious Achievements in Maharashtra Tennis Cricket
🌇 अंडरआर्म क्रिकेटपासून मोठ्या मंचापर्यंत
२००१ साली १० मध्ये शिकत असताना त्याच्या क्रिकेट चा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला तो अंडरआर्म क्रिकट खेळात असे आणि षटकार नव्हे, तर एकेरी-दुहेरी धाव घेत खेळ सुरु ठेवण्यावर त्याचा मुख्य फोकस असे. तो स्वतः सांगतो: “मी एकेरी खेळाडू होतो. षटकार मारू शकत नव्हतो, फक्त एकेरी-दुहेरी घेत असे.”
त्याच्या पहिल्या मालिकेत त्याने “मालिकावीर” म्हणून सायकल जिंकली — आणि तेच त्याच्या यशाचं पहिलं पाऊल ठरलं आणि मागे न पाहता त्याने क्रिकेट मध्ये आपलं करिअर करायला सुरुवात केली.
टेनिस क्रिकेट चा प्रवास सोपा नव्हता. नेहरू नगर परिसरातील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्याला खूप संघर्ष करावा लागला. म्हणूनच त्याने सरावासाठी दोन-तीन डावखुरे फिरकीपटू शोधून त्यांच्यावर खेळण्याचा सराव सुरू केला. त्याला क्रिकेट ची एवढी आवड निर्माण झाली कि त्याने अभ्यासाऐवजी त्याने आपल्या घराच्या बाल्कनीत क्रिकेटचा सराव सुरू ठेवला आणि तीन दिवस लपूनही चौथ्या दिवशी वडिलांनी त्याला पकडलं! पालकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरही त्याने हार न मानता आपली वाट बनवली — हीच ती जिद्द होती ज्याने त्याला टेनिस क्रिकेटच्या सर्वोच्च पातळीवर नेलं.
ओंकार म्हणतो — “मेरा आयडॉल मैं खुद हूं.” कारण टेनिस क्रिकेटच्या त्या काळात आदर्श फारसे नव्हते. स्वतः शिकणे, स्वतः सुधारत राहणे — हीच त्याची ओळख.
🔥 टेनिस क्रिकेटमधील ओंकार देसाईचा उदय
ओंकार ला व्यावसायिक टेनिस क्रिकेटमधील पहिली मोठी संधी सादी एचपी संघासोबत आली. त्यानंतर तो ताई पॅकर्स संघात सामील झाला आणि तीन वर्षे संघासाठी खेळला. एका लिलावात बाद झाल्यानंतर त्याचं करिअर संपेल असं वाटत असतानाच त्याने पुन्हा कमबॅक करत संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेलं — आणि तिथेच लोकांनी ओंकार देसाईकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली.
🧠 मानसिक तयारी आणि प्रेशर हँडलिंग
ओंकार म्हणतो कि मोठ्या सामन्यांमध्ये प्रेशर हा कायम असतो. तो प्रत्येक सामन्यापूर्वी स्वतःशी संवाद साधतो “आज काय शिकायचंय, हे आधी ठरवतो. जिंकणं आपोआप होतं.” त्याची ही मानसिक स्थिरता त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते.
🏠 कुटुंब, प्रेम आणि पालकत्वाचा आनंद
क्रिकेटच्या गडबडीतही ओंकार एक कुटुंबवत्सल माणूस आहे. त्याची आणि त्याच्या पत्नीची प्रेमकथा फेसबुकवर सुरू झाली. वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यातून गप्पा, नंबरची देवाणघेवाण आणि नंतर भेटी. जवळपास दीड वर्ष डेटिंगनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
तो कोकणी महाराष्ट्रीयन, ती दक्षिण भारतीय, आणि दोघांमध्ये सामाईक गोष्ट म्हणजे माशांवरील प्रेम!
👧 वेदिका आणि 👦 वेदांत — कुटुंबाची ताकद
ओंकारची मुलगी वेदिका दोन वर्षांची असून ओंकार तिच्यासाठी सुपरस्टार आणि सुपरहिरो आहे. मुलगा वेदांत लेदर क्रिकेटमध्ये मुंबई U-19 संघासाठी संभाव्य खेळाडू आहे.
ओंकार दोन्ही फॉरमॅट्स टेनिस आणि लेदर यांना समान महत्त्व देतो. “क्रिकेटशी जोडलेले राहणे हे एकाच फॉरमॅटमध्ये चमकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.”
💔 विराम आणि पुनरागमन
त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ म्हणजे त्याचा टेनिस क्रिकेट मित्र सँडी आणि भावाचा मृत्यू. सँडीचा मृत्यू झाल्यानंतर ओंकारने ५–६ महिने बॅट हातात घेतली नाही.
पण राजा पाटील या व्यवस्थापकाने त्याला पुन्हा उभे केले. त्याच्या पुनरागमनाने फक्त संघच नाही, तर तो स्वतःही पुन्हा जिंकला.
🔮 पुढील दशकात टेनिस क्रिकेट कुठे?
ओंकारचा दृष्टिकोन स्पष्ट आहे —
- टेनिस क्रिकेट आता तंत्रज्ञान, फिटनेस आणि अर्थव्यवस्था यांच्या संगमावर आहे.
- हे खेळाडूंना नोकरीच्या जोडीला करिअरचा पर्याय देणारे क्षेत्र बनू शकते.
- स्पिनर्सवर हल्ला करणे, गेममध्ये नाविन्य आणणे आणि फॉरमॅट्स एकत्र ठेवणे — हे पुढील दशकाचे वैशिष्ट्य असेल.
🧑🎓 नवोदित खेळाडूंना संदेश
- शिस्त हीच सर्वात मोठी प्रतिभा आहे.
- सोशल मीडियावर नाव कमावण्याऐवजी मैदानावर मेहनत घ्या.
- हार ही शिकण्याची संधी आहे, अपयश नव्हे.
🎯 भविष्यातील ध्येय
ओमकार देसाईचा उद्देश स्पष्ट आहे मुंबई टेनिस क्रिकेट अधिक व्यावसायिक आणि संघटित करणे.
त्याला स्थानिक स्तरावर नव्या स्पर्धा आणि कोचिंग सत्रांच्या माध्यमातून नवोदितांना संधी द्यायची आहे.
🌟 निष्कर्ष
Omkar Desai हा फक्त एक टेनिस क्रिकेटर नाही; तो एक प्रेरणास्त्रोत आहे. त्याचा प्रवास अंडरआर्मपासून सुपरस्टारपर्यंत केवळ मेहनतीचा नव्हे, तर आत्मविश्वासाचा पुरावा आहे. टेनिस क्रिकेटचे पुढील दशक जेव्हा लिहिले जाईल, तेव्हा त्याच्या पानांवर ओंकारचे नाव नक्की कोरलेले असेल.
