Sanket patil voleybal player

संकेत पाटील- 🏐 व्हॉलीबॉल चॅम्पियन्स लीग (VCL) मधला दमदार खेळाडू, पंजाब एरोस्ट्रायकर्सचा व्हॉलीबॉलपटू | VCL 2026

संकेत पाटील व्हॉलीबॉल खेळाडू हा खेळ आता आपल्या देशात हळू हळू नव्या उंचीवर पोचत आहे. व्हॉलीबॉल चॅम्पियन्स लीग (VCL), प्रो व्हॉलीबॉल तसेच राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सामन्यांमुळे अनेक खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी एक संधी भेटत असते. सध्या चालू असणारी VLC league मध्ये एक नाव खूप चर्च मध्ये आहे ते म्हणजे संकेत पाटील. Sanket Patil हा एक Spiker असून सध्या तो पंजाब एरोस्ट्रायकर्स संघाकडून खेळून आपल्या कामगिरीने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

कोण आहे संकेत पाटील? (Who is Sanket Patil Volleyball Player?)

आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील बाचणी या गावातील सुपुत्र कु. संकेत पाटील हे राष्ट्रीय स्तरावरील कमर्शियल व्हॉलीबॉल स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचे गाव आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो आज एक अभिमानाचा विषय बनला आहे. संकेत हे Outside Hitter या स्थानावर खेळतात आणि या स्थानावरील खेळाडूवर आक्रमक फटके मारणे, योग्य संधी साधणे आणि संघासाठी महत्त्वाचे गुण मिळवणे अशी महत्त्वाची जबाबदारी असते.

सीनियर स्टेट ते व्हॉलीबॉल चॅम्पियन्स लीग (VCL) चा प्रवास

संकेतने आपल्या करियर ची सुरुवात स्थानिक पातळीवर सुरु करून नंतर राज्य , राष्ट्रीय नंतर मोठी स्पर्धा सीनियर स्टेट व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप मधून केली. तिथे आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून नंतर त्याच्या खेळाची दखल मोठ्या मोठ्या राष्ट्रीय क्लब ने घेतली आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन्स लीगच्या च्या स्पर्ध्येत संधी भेटली . व्हॉलीबॉल चॅम्पियन्स लीगच्या पहिल्या हंगामात संकेत पाटील याला पंजाब एरोस्ट्रायकर या संघाने बोली लावली आणि खरेदी केलं . एका तरुण खेळाडूसाठी ही खूप मोठी कामगिरी मानली जाते.

Sanket patil voleybal player
Sanket patil voleybal player

पंजाब एरोस्ट्रायकर्सकडून लक्षवेधी कामगिरी

दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी नोएडा येथील इनडोअर स्टेडियममध्ये पंजाब एरोस्ट्रायकर्स आणि अयोध्या गर्जन यांच्यात सामना झाला. या सामन्यात पंजाब एरोस्ट्रायकर्सने २-१ असा विजय मिळवला.
सामन्यातील सेटचे गुण पुढीलप्रमाणे होते:
पहिला सेट: पंजाब एरोस्ट्रायकर्स २१ – १८ अयोध्या गर्जन
दुसरा सेट: पंजाब एरोस्ट्रायकर्स १६ – २१ अयोध्या गर्जन
तिसरा सेट: पंजाब एरोस्ट्रायकर्स २१ – ११ अयोध्या गर्जन
दुसऱ्या सेटमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर पंजाबच्या संघाने निर्णायक सेटमध्ये दमदार पुनरागमन केले. या विजयात योगदान दिल्याबद्दल संकेत पाटील यांना Player of the Match हा पुरस्कार मिळाला.

🏐 गावाचा अभिमान संकेत पाटीलचा दिमाखदार विजय; गुरु-शिष्याच्या नात्याचा अभिमानास्पद क्षण! 🇮🇳🏆

सामन्या दरम्यान आपल्या लाडक्या खेळाडू संकेत पाटीलचा खेळ पाहण्यासाठी गावातील गावकरी मोठ्या उत्साहाने गावाच्या मुख्य चौकात एकत्र जमले होते. व्हॉलीबॉल प्रेमी मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी त्याचा सामना पाहता यावा यासाठी मोठ्या स्क्रीनची खास व्यवस्था केली होती. 🏐📺

संकेत आणि त्याच्या संघाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दिमाखदार विजय मिळवला. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण मुख्य चौक फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघाला. 🎆🎉 गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि प्रत्येकाच्या मनातील अभिमान पाहण्यासारखा होता!

पण या जल्लोषात एक क्षण असा होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्या खेळाडूला मेहनत, शिस्त, जिद्द आणि संघर्षाची शिकवण देऊन घडवले, तोच शिष्य आज राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटवत आहे. आपल्या शिष्याला यशाच्या शिखराकडे वाटचाल करताना पाहण्यापेक्षा मोठा आनंद एका प्रशिक्षकासाठी दुसरा कोणता असेल? ❤️🏆

या संपूर्ण जल्लोषात गर्दीच्या मागे उभे राहून आपल्या शिष्याचा प्रत्येक खेळ निरखून पाहणारे त्याचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आदरणीय श्री. अजित पाटील सर!🙏

खऱ्या गुरुचे यश केवळ शिष्याने मिळवलेल्या विजयात नसते, तर त्या विजयामागे त्याने घेतलेल्या मेहनतीत आणि घडवलेल्या व्यक्तिमत्त्वात असते. आज संकेतच्या यशात अजित पाटील सरांच्या मार्गदर्शनाचे प्रतिबिंब दिसत आहे.

Sanket patil volleyball player