Saurabh Manjare Volleyball Libero

महाराष्ट्रातील चमकता तारा – सौरभ नमदेव मांजरे | व्हॉलीबॉल लिबेरोचा प्रेरणादायी प्रवास

Saurabh Manjare – महाराष्ट्राचा बेस्ट Volleyball Libero | Player Profile 2025

Saurabh Manjare Volleyball Libero म्हणून महाराष्ट्रातील व्हॉलीबॉल मध्ये ओळखला जातो. त्याने आज पर्यंत अनेक राज्यस्तर आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या मेहनतीमुळे तो महाराष्ट्रातील सर्वोत्तम लिबेरो खेळाडूंमध्ये गणला जातो.

प्रारंभिक प्रवास

क्रीडाविश्व म्हणजे फक्त शरीरसामर्थ्य नाही, तर त्याच्यात एक चिकाटी, सातत्य, संयम आणि प्रेरणा यांचा मिलाफ असतो. महाराष्ट्रा मधील खामगाव,बुलढाणा येथे राहणारे सौरभ मांजरे हे अशाच प्रेरणादायी खेळाडूंपैकी एक व्यक्तिमत्त्व आहे. Saurabh Manjare Volleyball Libero एक उर्जावान उत्कृष्ट व्हॉलीबॉलचा लिबेरो म्हणून ओळखला जाणारा सौरभ, आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण करतो आहे.

सौरभने आपल्या व्हॉलीबॉल कारकिर्दीची सुरुवात 2017 मध्ये खामगाव या आपल्या राहत्या घरी केली. सौरभने आता पर्यंत प्रचंड मेहनत, चिकाटी आणि संघर्षातून एक स्वतंत्र असे आपले स्थान व्हॉलीबॉल मध्ये निर्माण केले आहे.

 

या खेळाची खरी प्रेरणा त्याने Lion Marshal (इंटरनॅशनल प्लेअर ) सारख्या खेळाडूंमधून घेतली. सुरुवातीला काळामध्ये कुटुंबाकडून त्याला फारसा असा पाठिंबा नव्हता, मात्र त्याने त्याच्या कष्ठाने आणि चिकाटीने परिस्थिती बदलली.

Saurabh Manjare Volleyball Libero

सराव दिनचर्या आणि शिस्त

Saurabh Manjare हा लिबेरो म्हणजे डिफेन्सिव्ह या भूमिकेत खेळतो. लिबेरो म्हणजे म्हणजे मैदाना वरचा बचाव, प्रत्येक चेंडू खाली जमीनीला टेकू न देणं, सतत हालचाल आणि आपल्या संघासाठी ठाम आधार बनणं. 

चांगला लेबेरो बनण्यासाठी सौरभ दररोज 2 वेळा सराव करतो. सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत न चुकता सातत्याने मेहनत घेणे, ही सौरभची आता सवय झाली आहे. सौरभ च असं म्हणणं आहे कि  “जोपर्यंत यश हातात येत नाही, तोपर्यंत प्रयत्न थांबवू नका.” 

सौरभच्या म्हणण्यानुसार “सुरुवातीच्या काळात  काही चुका झाल्या होत्या, पण त्या सुधारून मी पुन्हा उभा राहिलो.”



🏆 स्पर्धांमधील सहभाग

सौरभ ने आज पर्यंत ग्रामीण पासून राष्ट्रीय पातळी वरील स्पर्धां मध्ये सहभाग घेतला आहे.

अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये त्याचा सहभाग होता त्यामध्ये

✅ शालेय राज्य (School State) – 1 वेळा

✅ असोसिएशन राज्य (Association State) – 9 वेळा

✅ छत्रपती चषक – 1 वेळा

✅ वरिष्ठ राष्ट्रीय (Senior Nationals) – 3 वेळा

या संपूर्ण प्रवासात, 2017-18 ची 19 वी राज्यस्तरीय स्पर्धा त्याच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

Saurabh Manjare Volleyball Libero

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि पुढील लक्ष्य

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघा मध्ये निवड व्हावी हे सौरभ स्वप्न आहे आणि त्याचे कष्ट करण्याची वृत्ती त्याचा ध्यास त्याला या दिशेने नेत आहेत.

सौरभ तरुण खेळाडूंना म्हणत आहे  “सतत खेळत रहा. जोपर्यंत ठरवलेली गोष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत मेहनत करत राहा. अपयश आलं तरी त्यातून धडा घ्या आणि पुन्हा उभे राहा.”

आपल्या सौरभ याने महाराष्ट्राच्या मातीतून उगम घेऊन राष्ट्रीय स्तरापर्यंतची वाटचाल सुरू केली आहे आणि  त्याच्या संघर्षमय प्रवासा मध्ये अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा आणि मार्गदर्शन देखील मिळेल. व्हॉलीबॉल सारख्या खेळात एक लिबेरो म्हणून सौरभने आपली छाप सोडली आहे आणि तो लवकरच आपल्या देशाच्या झेंड्याखाली खेळताना दिसेल, हीच प्रामाणिक अपेक्षा!

फोटो

विडिओ

📢 एक नोट: जर तुम्ही एक चांगले खेळाडू असाल किंवा एखाद्या खेळाडूची प्रेरणादायी गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवू इच्छित असाल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा. आमचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील नवोदित आणि नावाजलेल्या खेळाडूंना योग्य व्यासपीठ देणं.

अश्याच काही खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वाचू शकता