Ketan Mhatre Biker Man tennis cricket player

केतन म्हात्रे – टेनिस क्रिकेट सुपरस्टार – ३४+ बाईक्स आणि ७ कार जिंकणारा खेळाडू

केतन म्हात्रे हा महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू आहे. आपल्या दमदार फलंदाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर Ketan Mhatre Biker Man यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 3५+ बाईक्स आणि ७ कार जिंकत त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये यशाची नवी उंची गाठली आहे, ज्यामुळे केतन आज तरुणांसाठी मोठी प्रेरणा बनले आहेत.

🏏 सुरुवातीचा संघर्ष

केतन म्हात्रे यांची टेनिस क्रिकेट ची सुरुवात ठाणे जिल्यातील एका छोट्याशा गावातून झाली. केतन ने सुरुवातीला गाव पातळीवर अंडरआर्म क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. गावामध्ये क्रिकेट हा खूप प्रसिद्ध असा खेळ होता आणि गावाची टीम देखील चांगली होती . सुरुवातीला ते गावातील टीममध्येही कायमस्वरूपी खेळाडू नव्हते. अनेक वेळा ते १२व्या खेळाडू म्हणूनच बसायचे. बॅटिंगची संधीही कमी मिळायची.
पण त्यांची मेहनत आणि जिद्द कायम होती. २०१६ पासून त्यांनी मुख्य संघात खेळायला सुरुवात केली आणि ओपनर म्हणून स्वतःला सिद्ध केलं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कधीही मागे पाहिले नाही.

२०१६ मध्ये पहिली बाईक 🏍️ आणि बदललेलं आयुष्य

२०१६ मध्ये कार्डी चषक स्पर्धेत केतनला पहिली बाईक मिळाली – Yamaha FZ. ही त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली.
त्याच्यानंतर फक्त दिवसांत दुसरी बाईक जिंकून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
👉 याच क्षणापासून त्यांची ओळख “बायकर मॅन” म्हणून झाली.

🚗 ३४+ बाईक्स आणि ७ कार – मोठी कामगिरी

केतन ने आज पर्यंत ३४ पेक्ष्या जास्त बाईक्स आणि ७ कार टेनिस क्रिकेटमधून जिंकल्या आहेत.
पहिली कार: Datsun Redi-Go
मोठं स्वप्न पूर्ण: Swargiya Ratan Buva Smruti Chashak मध्ये Man of the Series जिंकून कार मिळवली
Nissan Magnite सारखी कारही त्यांच्या नावावर आहे.

ही कामगिरी टेनिस क्रिकेटमध्ये अत्यंत दुर्मिळ मानली जाते.

ISPL एक मोठी संधी

केतन म्हात्रे यांनी स्थानिक टूर्नामेंटमध्ये चमकदार कामगिरी करत हळू हळू मोठ्या स्पर्धांमध्ये प्रवेश केला. ते आक्रमक ओपनर म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या फलंदाजीची खासियत म्हणजे मोठे षटकार मारण्याची क्षमता.

ISPL (Indian Street Premier League) सारख्या मोठ्या लीगमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांनी एका सामन्यात 21 चेंडूत 60 धावा केल्या तसेच एका षटकात सलग 5 षटकार मारण्याचा पराक्रमही केला आहे.

2024 मध्ये त्यांची बोली ₹16.5 लाख होती आणि ISPL सिझन ३ मध्ये एक मोठी बोली त्यांच्या कामगिरीवर लावण्यात आली आणि या वर्षी २०२६ मध्ये त्यांना तब्बल २६.५० लाख मध्ये चेन्नई सिंघम या संघाने खरेदी केले

👨‍👩‍👦 कुटुंबाचा मोठा सपोर्ट

केतनच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा हात आहे.

  • १२वी नंतर त्यांनी नोकरी सुरू केली
  • नोकरीसोबत क्रिकेट खेळत राहिले
  • आई-वडिलांनी नेहमी पाठिंबा दिला

👉 “जॉब + क्रिकेट” हा त्यांचा मंत्र आजही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

🌍 टेनिस क्रिकेटमुळे मिळालेलं जग

क्रिकेटमुळे केतनला:

  • दुबईसारख्या ठिकाणी खेळण्याची संधी
  • देशभरातील मोठ्या स्पर्धांमध्ये भाग
  • प्रचंड फॅन फॉलोइंग

मिळाली आहे.

🧠 टेनिस क्रिकेट बद्दल त्यांचा संदेश

केतन स्पष्ट सांगतात:

👉 जर तुम्ही चांगलं टेनिस क्रिकेट खेळलात, तर तुमचं घर चालू शकतं.
👉 पण फक्त हौसेसाठी खेळणाऱ्यांनी जॉबसोबत क्रिकेट करावं.