Cricket Tennis मध्ये Compro म्हणजे काय असते जाणून घ्या खरी Reality मराठी माहिती

🏏 Cricket Tennis मध्ये “Compro” म्हणजे काय असते? जाणून घ्या खरी Reality

आजच्या काळात जर कोणता खेळ सर्वात लोकप्रिय आहे तो म्हणजे क्रिकेट टेनिस cricket tennis (tennis cricket). हा खेळ आज गावापासून शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. Night tournaments, मोठी prize money, आणि social media आणि live प्रक्षेपण मुळे या खेळाला वेगळी ओळख मिळाली आहे.
पण या खेळात काही असे शब्द वापरले जातात जे सामान्य लोकांना सहज समजत नाहीत. त्यापैकी एक चर्चेत असलेला शब्द म्हणजे “Compro”. आज आपण कॉम्प्रो बदल जाणून घेणार आहोत. काय असते compro? कस केलं जात? कुणाला होतो फायदा? आणि चांगला कि वाईट ?

🧠 Compro म्हणजे नेमकं काय?

कोणत्याही खेळामध्ये “Compro” म्हणजे दोन किंवा अधिक टीममध्ये नाहीतर खेळाडूंमध्ये झालेला एक चांगला वाईट समझोता (deal / compromise)

🔥 Tennis Cricket मध्ये Compro कसा होतो?

अलीकडच्या काळात आपण पाहिले असता विविध क्रीडा स्पर्धांमध्ये, विशेषतः सेमीफायनल आणि फायनल टप्प्यात, ‘कॉम्प्रो’ (समझोता) करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. यामध्ये स्पर्धेत उरलेल्या चार संघांमध्ये परस्पर सहमतीने एकूण बक्षीस रक्कम समान वाटून घेण्याचा निर्णय घेतला जातो. आणि 

👉 उदाहरण (Compro Calculation):

  • 🥇 1st Prize = ₹1,00,000
  • 🥈 2nd Prize = ₹50,000
  • 💰 Total Prize Pool = ₹1,50,000
  • 🤝 जर 4 टीम्समध्ये Compro झाला तर:
    • ₹1,50,000 ÷ 4 = ₹37,500
  • प्रत्येक टीमला मिळणारी रक्कम = ₹37,500

सामना हा फक्त ट्रॉफी साठी खेळाला जातो.

🧑‍🌾 Tenis Cricket फक्त खेळ नाही — उदरनिर्वाहाचा मार्ग

स्थानिक पातळीवरील टेनिस क्रिकेट अनेकांसाठी केवळ मनोरंजन किंवा छंद नसून, तो त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत, या खेळावर अवलंबून असलेल्या खेळाडूंची संख्या लक्षणीय आहे. काहींनी तर टेनिस क्रिकेटलाच पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे. साधी आर्थिक परिस्थिती आणि मर्यादित उत्पन्नाच्या संधींमुळे प्रत्येक सामना त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

👉 अशा वेळी, सामना  जिंकला नाही तर काहीच मिळत नाही, ही परिस्थिती खूप कठीण असते. 

म्हणून मग अश्या प्रकारचे कॉम्प्रो महत्वाचे ठरतात. यात सेमी फायनल मधील चारही संघाना ठराविक मानधन कॉम्प्रो मधून मिळते

🛤️ दूरवरून येणाऱ्या खेळाडूंची ची परिस्थिती

आज अनेक खेळाडू १०० ते २०० किलोमीटर दूरवरून स्पर्धा खेळण्यासाठी प्रवास करतात. हा प्रवास ते स्वतःच्या खिशातून करतात. त्यात बस, ट्रेन, खासगी वाहनांचा खर्च, राहण्याची व्यवस्था, जेवण—हे सगळं त्यांनाच सांभाळावं लागतं. एक स्पर्धा खेळण्यासाठी ते 2 ते 3 दिवस घरापासून दूर राहतात. संघमालक काही येण्याचं आणि जाण्याचा थोडाफार खर्च उचलतात.

परंतु, या सगळ्या मेहनतीनंतर जर त्यांची टीम हरली, तर त्यांना एक रुपयाही मोबदला मिळत नाही. हा मुद्दा आज टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंसाठी सर्वात मोठा अडथळा बनला आहे. मग मानधन वाटून घेणे हा एक चांगला निर्णय असू शकतो. दोन्ही सेमी फायनल मधील संघांची जर मान्यता असेलतर कॉम्प्रो केला जातो.

💰 Compro चा फायदा कुणाला होतो

उपांत्य फेरीतील चारही संघाने जर एकमताने कॉम्प्रो केला तर पैसे समांतर दिले जातात आणि ट्रॉफी साठी सामना खेळला जातो.
उपांत्य फेरीतील हरलेले जे संघ असतात त्यांना देखील कॉम्प्रो मधील पैसे मिळतात आणि हरलेल्या संघाचे आर्थिक नियोजन व्यवस्थित होते.
उपांत्य फेरी साठी चारही संघ खूप मेहनत आणि ४ -४ सामने खेळून आलेले असतात आणि अश्यात उपांत्य फेरी मध्ये यश नाही भेटले तर नैराश्य आलेले असते आणि यात कॉम्प्रो झाल्यामुळे हरलेल्या संघाना देखील आर्थिक मदत होते आणि तो पैसा एक आधार म्हणून काम करतो.

🌟 टेनिस क्रिकेट मधील संधी आणि भविष्य

आज क्रिकेट टेनिस हा केवळ गावपातळीवरील खेळ राहिलेला नाही, तर तो हळूहळू एक मोठा प्लॅटफॉर्म बनत आहे. सध्या या खेळातून अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत.

👉 Local tournaments मोठ्या प्रमाणावर आयोजित होत आहेत.
👉 Private leagues सुरू होत आहेत.
👉 Sponsorships आणि brand support वाढत आहे.

यामुळे टेनिस क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत आहे.

मात्र, या सकारात्मक बदलांबरोबर काही मोठ्या अडचणी अजूनही कायम आहेत.

👉 अनेक खेळाडूंना अजूनही stable income मिळत नाही
👉 स्पर्धांवर अवलंबून राहावं लागतं
👉 जिंकले तरच कमाई, अन्यथा पूर्ण तोटा

यामुळे खेळाडूंना आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो.